अडविलेला शेतरस्ता झाला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:24+5:302021-03-07T04:29:24+5:30

उस्मानाबाद : पूर्वापार वहिवाटीचा अडविलेला रस्ता पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयाने ...

The blocked farm road became open | अडविलेला शेतरस्ता झाला खुला

अडविलेला शेतरस्ता झाला खुला

उस्मानाबाद : पूर्वापार वहिवाटीचा अडविलेला रस्ता पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयाने हा रस्ता खुला करून दिला. यामुळे तालुक्यातील बामणी येथील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील बामणी येथील शेतकरी किशोर बापू लांडे, अतुल रमेश लांडे व कमलाकर गुंडाप्पा लांडे यांना त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता उपलब्ध नव्हता. जमीन गट नं. २९१ व २९३ च्या सरबांधावरील दक्षिण बाजूकडील पूर्वापार वहिवाटीचा पूर्व-पश्चिम असलेला रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. याबाबत अर्जदारांनी अ‍ॅड. डी. एन. सोनवणे यांच्यामार्फत तहसीलदारांकडे अर्ज देऊन अडविलेला हा रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत तहसीलदारांच्या निर्देशानुसार बामणी महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी व्ही. बी. काळे, तलाठी एस. एस. कानडे यांनी स्थळ पाहणी केली व नंतर जेसीबीच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी अडविलेल्या रस्त्यातील अडथळे दूर करून हा रस्ता खुला करून दिला.

Web Title: The blocked farm road became open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.