शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: हत्येनंतर महिलेच्या मृतदेहासोबत २ दिवस झोपला, दुर्गंधीमुळे फरार; आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:50 IST

द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हत्याकांडाचा उलगडा; ब्लॅकमेलिंग, छळाचा शेवट हत्येत, मुख्य आरोपीसह दोघे गजाआड

कळंब : अखेर द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हत्याकांडाचा छडा लागला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी रामेश्वर भोसले यास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर येरमाळा येथे पकडण्यात आले. 

45 वर्षीय मनीषा बिडवे-कारभारी हिचा मृतदेह 27 मार्च रोजी तिच्या राहत्या घरात सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाचा संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी त्यात कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस तपासानुसार, मनीषा बिडवे हिच्याकडे रामेश्वर भोसले हा काही महिन्यांपासून कामाला होता. सुरुवातीला तो तिचा ड्रायव्हर होता, पण त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. काही काळानंतर मनीषा त्याला नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करू लागली. त्याला धमक्या देत शारीरिक आणि मानसिक छळ करत होती.  

100 उठाबशांनंतर खून!22 मार्च रोजी मनीषाने रामेश्वरला 100 उठाबशा काढायला लावल्या. या टॉर्चरला कंटाळून त्याने तिच्या डोक्यात घाव घातला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर तो दोन दिवस मृतदेहासोबतच राहिला आणि तिथेच जेवत होता. मात्र दुर्गंधी सुटल्यावर तो पळून गेला. त्याने केजमधील मित्र उस्मान सय्यदला मृतदेह दाखवला आणि पुरावे नष्ट करण्याचा कट रचला.  

मुख्य आरोपी अखेर जाळ्यातपुराव्यांच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मान सय्यदला तीन दिवसांपूर्वी अटक केली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या धाग्यांवरून मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला येरमाळा येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहानखान पठाण, जावेद काझी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव