शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पिकवला ब्लॅक राईस, बळीराजाचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 19:17 IST

प्राचीन काळात काही देशांत राजघराण्यातील रसोईत शिजणारा तांदूळ म्हणून ब्लॅक राईसची ख्याती होती.

ठळक मुद्देताटातील अन्नपदार्थाची समृद्धी वाढीस लावतानाच आर्थिक सुबत्तेचेही दार उघडले आहे.मणिपूरच्या ‘चा-खाऊ’ व ओडिशी ‘कालाबात्ती’ या तांदूळ वाणाचे दोन किलो बियाणे मागविलेउस्मानाबाद जिल्ह्यातील माळकरंज्याच्या माळावर बळीराजाने पिकविला ब्लॅक राइस

- बालाजी अडसूळ

कळंब (जि.उस्मानाबाद) : आजवर हातसडीचा ते इंद्रायणी असा तांदळाचा प्रवास अनुभवलेल्या आपल्या मातीत एकेकाळी ‘रॉयल फॅमिली’चा तांदूळ म्हणून ओळखला जाणारा ब्लॅक राईसही पिकविला जातो. यास कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील बळीराजांनी वास्तवात उतरवून दाखविले आहे. 

जगभरातील भटारखान्यात तांदळाचा हमखास वापर केला जातो. यातही हातसडीच्या विविध गावरान जातीपासून आंबेमोहोर, इंद्रायणी, कोलम, चिन्नोर ते बासमती अशा अनेक शुभ्र रंगाच्या तांदळाचा स्वाद अन् आस्वाद सर्वांना परिचितच आहे. या स्थितीत काळ्या रंगाच्या तांदळाचा स्वाद अन् वाण या दोन्ही गोष्टी म्हणजे एक अप्रूपच होय, असा काळा तांदूळ असतो अन् तो आपल्या मातीत पिकतो, हे माळकरंजा येथे प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या एका पीक प्रयोगातून समोर आले आहे. येथील महेश रघुनाथराव लोमटे पाटील यांनी आपल्या  शेतात हॉर्टिकल्चरमध्ये डॉक्टरेक्ट असलेले स्नेही रणजित शिंदे (बाभळगाव, ता. बार्शी) यांच्या मदतीने कॅनडा येथे कार्यरत अग्रिकल्चरल प्रोफेसर डॉ. जयशंकर सुब्रह्मण्यम यांचे मार्गदर्शन घेत ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा प्रयोग फलश्रुतीस आणला आहे. या प्रयोगातून त्यांनी ताटातील अन्नपदार्थाची समृद्धी वाढीस लावतानाच आर्थिक सुबत्तेचेही दार उघडले आहे.

ओडिशातून आणले बियाणेओडिशाच्या एका मित्राकडून मणिपूरच्या ‘चा-खाऊ’ व ओडिशी ‘कालाबात्ती’ या तांदूळ वाणाचे दोन किलो बियाणे मागविले व जुलैमध्ये महेश पाटील यांच्या हलक्या जमिनीत दोन ओळीत ४५, तर दोन रोपांत १० सें.मी. अंतर राखत तिफणीने पेरणी केली. यानंतर पीक ‘ऑरगॅनिक’ पद्धतीने घेण्याचे निश्चित करीत पेरणी ते काढणीदरम्यान केवळ शेण, गोमूत्र यांचाच वापर केला. साधारणतः ‘चा-खाऊ’ १३०, तर ‘कालाबात्ती’ वाण १४५ दिवसांत हाती आले. यापासून ७ ते ८ क्विंटल काळ्या तांदळाचे यशस्वी उत्पादन मिळाले आहे. बाजारात दीडशे ते पाचशे व बियाणे म्हणून हजार ते तीन हजार रुपये प्रतिकिलो दराचा माल उत्पादित केला असल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.

व्हाइट टू ब्लॅक : तांदळाची नवी नवलाई... प्राचीन काळात काही देशांत राजघराण्यातील रसोईत शिजणारा तांदूळ म्हणून ब्लॅक राईसची ख्याती होती. तो सामान्यांत विस्तारलाच नाही. त्यामुळे आजही ठरावीक ठिकाणीच दिसत असलेला हा तांदूळ तसा आपल्यासाठी एक नवलाईचाच. नागालँडमध्ये बेला राईस, छत्तीसगढमध्ये करियाझिगी, चीनमध्ये फॉरबीडन राईस, तर ओडिशात कालाबात्ती व मणिपुरात चा-खाऊ नावाने हा काळा, ब्राऊन राईस उत्पादित होतो. असा हा देशांतर्गत दुर्मिळ व आपल्या प्रांती नवा असलेला ब्लॅक राईस माळकरंजा येथील माळरानावर  उत्पादित झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद