पुन्हा सत्तेसाठी भाजपाचा खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:30 IST2021-03-24T04:30:04+5:302021-03-24T04:30:04+5:30

तुळजापूर : सध्या भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यपालांच्या तर आ. राम कदम आयुक्तांच्या भेटीला, आठवले संसदेत, महाराष्ट्र विरोधी पक्षनेते ...

BJP's struggle for power again | पुन्हा सत्तेसाठी भाजपाचा खटाटोप

पुन्हा सत्तेसाठी भाजपाचा खटाटोप

तुळजापूर : सध्या भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यपालांच्या तर आ. राम कदम आयुक्तांच्या भेटीला, आठवले संसदेत, महाराष्ट्र विरोधी पक्षनेते आ. देवेंद्र फडणवीस पत्रकारपरिषेत गर्क आहेत. या सर्व घटनांचा बारकाईने विचार करता भाजपचा हा सगळा खाटाटोप महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून सत्ता मिळवण्यासाठीच आहे. यासाठीच राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख यांना भाजपचे नेते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुशील शेळके यांनी केला.

सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकार अत्यंत पारदर्शीपणे जनतेच्या विकासाची कामे करत आहे. केंद्र सरकार मात्र जाणूनबुजून महाराष्ट्राच्या हक्काचा हजारो कोटी रुपये जीएसडी अडवून महाराष्ट्राची आर्थिक कोंडी करत आहे. असे असले तरी महाविकास आघाडी सरकार खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा गाडा सुरळीतपणे चालवत असल्याचे प्रा. शेळके म्हणाले. यावेळी धैर्यशील पाटील, गोकुळ शिंदे, त्रिगुणशील साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: BJP's struggle for power again