उस्मानी यांच्याविराेधात भाजपा युवा माेर्चा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:51+5:302021-02-05T08:18:51+5:30

उस्मानाबाद -पुणे येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांनी भारतीय संघराज्य व हिंदू समाजाबाबत आपत्तीजनक ...

BJP youth leader's aggression against Osmani | उस्मानी यांच्याविराेधात भाजपा युवा माेर्चा आक्रमक

उस्मानी यांच्याविराेधात भाजपा युवा माेर्चा आक्रमक

उस्मानाबाद -पुणे येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांनी भारतीय संघराज्य व हिंदू समाजाबाबत आपत्तीजनक वक्तव्य करून दाेन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधिताविरूद्ध गुन्हा नाेंदविण्यात यावा, या मागणीसाठी भाजपा युवा माेर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने पाेलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

३० जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे एल्गार परिषद झाली. या कार्यक्रमासाठी आयाेजकांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. उस्मानी यांनी आपल्या भाषणात भारतीय संघराज्य व हिंदू विरोधात अत्यंत आपत्तीजनक विधाने केली. या माध्यमातून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा व दाेन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे उस्मानी यांच्याविराेधात गुन्हा नाेंदविण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा माेर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. पदाधिकार्यांनी पाेलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तसे निवेदनही त्यांना सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, विनोद निंबाळकर, संदीप इंगळे, राहुल शिंदे, कुलदीप भोसले, हिंमत भोसले, सुरज शेरकर, सुजित साळुंके, श्रीराम उंबरे, प्रीतम मुंडे, भगवंत गुड पाटील, स्वानंद पाटील, शंकर मोरे, विजय पडवळ, प्रसाद राजमाने, रोहन घाडगे, प्रमोद गेणगे, आदित्य पाटोळे आदींची उपस्थिती हाेती.

Web Title: BJP youth leader's aggression against Osmani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.