बसस्थानकात केले भाजपने पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:30+5:302021-06-29T04:22:30+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या छताचे प्लास्टर रविवारी सकाळी कोसळले होते. नवीन स्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवला ...

बसस्थानकात केले भाजपने पूजन
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या छताचे प्लास्टर रविवारी सकाळी कोसळले होते. नवीन स्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवला आहे. या सध्याच्या जीर्ण इमारतीमुळे प्रवाश्यांना धोका निर्माण झाल्याने सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी छत पडलेल्या ठिकाणी पूजन करून आंदोलन केले.
जवळपास ५० वर्षापासूनची ही इमारत पाडून त्याठिकाणी अद्ययावत बसस्थानक उभे करावे, अशी नागरिकांची मागणी असताना याबाबत अद्यापही काहीच प्रक्रिया झाली नाही. मागील काळात सदरच्या बसस्थानकाच्या ठिकाणी बीओटी तत्त्वावर सुसज्ज स्थानक निर्माण करण्याचे ठरले. त्यासंदर्भात भूमिपूजनही मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे काम रद्द झाले, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. परिणामी, प्रवासी जीव मुठीत घेऊन बसस्थानकाचा वापर करतात. सद्य:स्थितीत बसस्थानकाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे, परिसरात खड्डे पडून धूळ व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे, आणि अशातच परवा पहाटेच्या वेळी थोड्याशा पावसात स्थानकाचे छत कोसळले. याचा निषेध म्हणून भाजपने छत पडलेल्या ठिकाणी पूजा करून प्रशासनाचा निषेध केला. याप्रसंगी शहराध्यक्ष राहुल काकडे, सुजित साळुंके, सूरज शेरकर, प्रसाद मुंढे, शुभम माळकर उपस्थित होते.