दूध दरावरून भाजपा ओबीसी सेल आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:20+5:302021-06-18T04:23:20+5:30
सध्या खासगी दूध संस्था दूध १७ ते १८ रुपये प्रतिलीटर या भावाने विकत घेत आहेत. पाण्याची बाटली वीस ...

दूध दरावरून भाजपा ओबीसी सेल आक्रमक
सध्या खासगी दूध संस्था दूध १७ ते १८ रुपये प्रतिलीटर या भावाने विकत घेत आहेत. पाण्याची बाटली वीस रुपये प्रतिलीटर दराने विक्री होते. त्यापेक्षाही दुधाला कमी दर मिळतो, ही दूध उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. यामुळे शेतीसाठी जोडधंदा म्हणून केला जाणारा दूध उद्योग संकटात सापडला आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने दूध दरवाढ जाहीर करावी, शेतकऱ्यांना अनुदानावर पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या करीत भाजपा ओबीसी सेलकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. याबाबतीत तातडीने निर्णय न झाल्यास वेळप्रसंगी माेर्चा काढू, असा इशाराही दिला आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर भाजपचे अजित पिंगळे, मकरंद पाटील, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, राज्य परिषद सदस्य शिवाजी गिड्डे-पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने, उपाध्यक्ष सतीश वैद्य, चिटणीस सावता माळी, नारायण टेकाळे, प्रताप पडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.