खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:04+5:302021-01-13T05:25:04+5:30

येणेगूर : वेळामवस्या व मकर संक्रांतीच्या पूर्व संध्येला सोमवारी येणेगूरच्या आठवडी बाजारात बाजारकरूंची भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी मोठी ...

Big rush of citizens for shopping | खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड

खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड

येणेगूर : वेळामवस्या व मकर संक्रांतीच्या पूर्व संध्येला सोमवारी येणेगूरच्या आठवडी बाजारात बाजारकरूंची भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती.

मंगळवारी वेळामवस्या व यापाठोपाठ मकर संक्रांत येत असल्याने परिसरातील २५ ते ३० गावांतील बाजारकरूंची विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली. या गर्दीमुळे गावच्या वेशीतून ते मारुती मंदिरापर्यंतच्या दोनशे फूट अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्धा तास लागत होता. संक्रांतीचे वाण व वेळामस्येचा भाजीपाला खरेदीसाठी महिला वर्गाची अधिक गर्दी दिसून आली. या आठवडी बाजारात मेथी, पालक व कोथिंबीरशिवाय इतर भाज्यांचे दर मात्र वधारले होते. विशेष म्हणजे मास्क लावून बाजारात फिरावे व व्यापाऱ्यांनीही मास्कचा वापर करण्यासाठी ग्रामपंचयातीने दवंडी दिली होती. परंतु, बहुतांश बाजारकरूंनी याकडे कानाडोळा केला. फिजिकल डिस्टन्सचाही पुरता बोजवारा उडाला होता.

Web Title: Big rush of citizens for shopping