कळंब येथे कॅनव्हस इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे आज भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:38 IST2021-08-14T04:38:13+5:302021-08-14T04:38:13+5:30

ज्ञानतंत्र शिक्षण प्रसारक मंडळ पुणे यांच्या वतीने तांदूळवाडी रोडवरील जागेत सुरू करण्यात येत असलेल्या या शाळेचे भूमिपूजन शनिवारी सकाळी ...

Bhumipujan of Canvas International Smart School at Kalamb today | कळंब येथे कॅनव्हस इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे आज भूमिपूजन

कळंब येथे कॅनव्हस इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे आज भूमिपूजन

ज्ञानतंत्र शिक्षण प्रसारक मंडळ पुणे यांच्या वतीने तांदूळवाडी रोडवरील जागेत सुरू करण्यात येत असलेल्या या शाळेचे भूमिपूजन शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता औसा विधानसभा मतदारसंघाचे आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, पत्रकार राहुल कुलकर्णी, प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर यांची उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा असणार आहेत, तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांची उपस्थिती राहणार आहे, असे ज्ञानतंत्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवि नरहिरे यांनी कळवले आहे.

Web Title: Bhumipujan of Canvas International Smart School at Kalamb today