भास्कर शिंदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:54+5:302020-12-23T04:27:54+5:30

कळंब : तालुक्यातील सात्रा येथील रहिवाशी,ज्येष्ठ मृदंगाचार्य हभप भास्कर विठ्ठलराव शिंदे (वय ८१) यांचे सोमवारी निधन झाले. कळंब ...

Bhaskar Shinde passed away | भास्कर शिंदे यांचे निधन

भास्कर शिंदे यांचे निधन

कळंब : तालुक्यातील सात्रा येथील रहिवाशी,ज्येष्ठ मृदंगाचार्य हभप भास्कर विठ्ठलराव शिंदे (वय ८१) यांचे सोमवारी निधन झाले. कळंब येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, भाऊ, बहीण, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

जिजाबाई बनसोडे

(फोटो : २३)

उस्मानाबाद : येथील जिजाबाई दामोदर बनसोडे (वय ९०) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवारी सकाळी येथील कपिलधार स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश बनसोडे, माजी नगरसेवक अशोक बनसोडे यांच्या त्या मातोश्री होत.

सुनिता सुरवसे

(फोटो - समीर सुतके २२)

उमरगा : येथील माजी नगरसेविका सुनिता बळीराम सुरवसे (वय ४४) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी कोरेगाव रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. आडत व्यापारी बळीराम सुरवसे यांच्या त्या पत्नी होत.

Web Title: Bhaskar Shinde passed away