भरधाव कार पुलाच्या कठड्यावर आदळली, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST2021-01-13T05:23:49+5:302021-01-13T05:23:49+5:30

चाैघे जखमी- मयत व जखमी जालना जिल्ह्यातील वाशी (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर येथून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन आटाेपून जालन्याकडे ...

Bhardhaw's car collided with the bridge wall, killing one | भरधाव कार पुलाच्या कठड्यावर आदळली, एक ठार

भरधाव कार पुलाच्या कठड्यावर आदळली, एक ठार

चाैघे जखमी- मयत व जखमी जालना जिल्ह्यातील

वाशी (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर येथून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन आटाेपून जालन्याकडे परतणाऱ्या भाविकांची कार सोलापूर- औरंगाबाद महामार्गावर कन्हेरी फाट्यानजीक पुलाच्या कठड्यावर आदळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, जालना येथील महिको सीडस्‌ कंपनीमध्ये पर्चेस मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले प्रफुल्ल गोविंदराव निटूरकर हे तुळजापूर येथून देवदर्शन करून सहकुटुंब कारने (क्र. एमएच-२१ व्ही-१००५) जालन्याकडे जात हाेते. त्यांची कार साेलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी फाट्याजवळील (ता. वाशी) आली असता, चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात प्रफुल्ल गोविंदराव निटूरकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाल, तर त्यांची पत्नी प्रणाली निटूरकर (वय ४४), मुलगी प्रसन्ना निटूरकर (वय १८) व जुळ्या बहिणी स्वानंदी व स्वराली निटूरकर (वय १३), असे चाैघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले.

चाैकट...

वाशी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मल्टिस्टेटच्या वाशी शाखेचे मॅनेजर चंद्रकांत नाईकवाडी हे घटनास्थळी हाेते. त्यांनी लागलीच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बाेलावून जखमींना कारबाहेर काढले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करता आले.

100121\10osm_2_10012021_41.jpg

वाशी तालुक्यातील कन्हेरी फाट्यानजीक रविवारी दुपारी भरधाव कार पुलाच्या कठड्यावर आदळली. 

Web Title: Bhardhaw's car collided with the bridge wall, killing one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.