गणेगावात ‘परिवर्तन’ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST2021-01-21T04:29:42+5:302021-01-21T04:29:42+5:30
भूम : तालुक्यातील गणेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन महाविकास अघाडीने ९ पैकी ७ जागा जिंकत सेनेचे परमेश्वर हुके यांच्या नेतृत्वाखालील ...

गणेगावात ‘परिवर्तन’ची बाजी
भूम : तालुक्यातील गणेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन महाविकास अघाडीने ९ पैकी ७ जागा जिंकत सेनेचे परमेश्वर हुके यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव केला. निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथे परिवर्तन महाविकास अघाडी व सेना पुरस्कृत पॅनलमध्ये लढत झाली. यात महाविकास अघाडीचे गजानन चव्हाण, कोमल शिंदे, कमल जाधव, प्रशांतराजे जाधव, समाधान कुंभार, सानिया शेख, शहदाबी सय्यद तर हुके यांच्या पॅनलमधून उदयसिंह जाधव व जहिराबी शेख हे उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या विजयासाठी रावसाहेब मोरे, राजाभाऊ मोरे, गजानन चव्हाण, विक्रम जाधव, भागवत जाधव, बाबुराव इंगोले यांनी पुढाकार घेतला.
जेजला ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता
पाथरुड: भूम तालुक्यातील जेजला ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन झाले असून, सातपैकी चार जागेवर विजय मिळवून राष्ट्रवादीचे बालाजी गटकळ पॅनलचा झेंडा फडकला. प्रथमच येथील ग्रामपंचायत मतदारांनी नवख्या तरुणांच्या हाती दिली आहे. येथील एका सदस्याची निवड बिनविरोध झाल्याने उर्वरित सहा जागांसाठी दोन पॅनलमध्ये दुरंगी लढत झाली. यात बालाजी गटकळ यांच्या पॅनलचे वैभव बनसोडे, गणेश थोरात, पद्मीन गोलेकर, पूजा मंडलिक तर जय रघुवीर उंडेकर बाबा पॅनलचे सागर भोसले, उर्मिला शिंदे, अज्ञानबाई गटकळ हे तीन उमेदवार विजयी झाले.