उस्मानाबाद - महाआवास अभियानाच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाची कामे पूर्ण केली आहेत. अशा काही लाभार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी, लाेकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या किल्ल्या सुपुर्द करण्यात आल्या.
ग्रामीण भागातील कच्च्या घरामध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना पक्का निवारा मिळावा यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून विविध याेजना राबविण्यात येतात. संबंधित याेजनांची अंमलबजावणी गतिमान पद्धतीने व्हावी, यासाठी २० नाेव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत जिल्ह्यात राज्य महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत अनेकांनी घरकुले पूर्ण केली. प्रातिनिधिक स्वरूपात अशाच काही लाभार्थ्यांना हक्काच्या घरकुलाच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या. आष्टा व वांगी (बु.) येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ढवळशंख, विस्तार अधिकारी इंगळे, गृह अभियंता अण्णासाहेब चव्हाण, ग्रामीण अभियंता आकाश काेरे, अभियंता प्रताप पाटील, अभिमन्यू हवालदार, आष्टा गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते तात्यासाहेब अष्टेकर, ग्रामसेवक केंद्रे, सुभाष गव्हाणे, वसंत घाडगे, तुकाराम शेळके, सतीश कदम, राजेश सोळस्कर, रवींद्र वाघमारे, वांगी गावचे सरपंच रेणुका गुंजाळ, ग्रामसेवक एन.पी. काकडे गुंजाळ, अतुल माळी, प्रभाकर शेळके हनुमंत झिल आदी उपस्थित हाेते.