शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

‘महाविद्यालयास अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्या’ तुळजापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ...

‘महाविद्यालयास अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्या’

तुळजापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे, अशी मागणी व्हीकेग्रुप एक नवा विचार मंच यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष विजय क्षीरसागर, सचिव आकश शिंदे, गणेश कसबे, गोविंद कसबे, उमेश कांबळे, धीरज कांबळे, संजय पारधे, महावीर क्षिरसागर, निखिल सिद्धगणेश यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मार्गदर्शक सूचनापत्रिकांचे वाटप

वाशी : तालुक्यातील पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बर्ड फ्लू रोग प्रादुर्भाव व प्रसाराबाबत मार्गदर्शक सूचनांच्या पत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धनचे उपायुक्त पसरटे, पशुसंवर्धनचे जिल्हा आरोग्य अधिकारी आघाव, तालुका पशुसंवर्धन अधिकारी आलमवार, कुलकर्णी, प्रा. डॉ. विश्वास चौधरी व पोल्ट्री उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

प्रजासत्ताकदिनी १४४ कलम लागू

उस्मानाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम होणार असल्याने या अनुषंगाने शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते सर्कीट हाऊसपर्यंत २५ जानेवारी रोजी रात्री १२ ते २६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

अधिकाऱ्यांत विसंवाद; कामगारांना होतोय त्रास

उस्मानाबाद : नगरपालिका व बांधकाम कामगार नोंदणी कार्यालय येथील कार्यालयीन अधिकाऱ्यांमधील विसंवादामुळे कामगारांना त्रास होत असून, तो थांबवावा. तसेच प्रमाणपत्रावर शिक्का देण्यासाठी दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी भीम निर्णायक युवा संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन दिलपाक, जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, युवा कामगार आघाडीचे विष्णू कांबळे उपस्थित होते. बांधकाम नोंदणी ऑनलाईन झाल्यापासून कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

तुळजापूर : लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे व विशाल लोंढे यांनी अनुकंपाधारक नियुक्तीच्या अनुषंगाने वारंवार नगरपरिषद कार्यालयात येऊन पी. पी. बरूरकर व दत्ता साळुंके यांना धमकी देवून शासकीय कामात अडथळा केल्याचा आरोप करीत येथील पालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. यामुळे दिवसभर पालिकेचे कामकाज बंद राहिले. या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली.

किशोर-किशोरी हितगुज बैठक

वाशी : जाणीव संघटनेच्या वतीने झिन्नर येथील महात्मा बसेश्वर विद्यालयात किशोर-किशोरी हितगुज बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी मुख्याध्यापक कावळे होते. यावेळी नेतृत्व, कौशल्य, वक्तृत्व कौशल्य, कलागुणांत वाढ व्हावी, यासाठी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुला-मुलींना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय यावरही माहिती दिली. नवनाथ मोरे यांनी आभार मानले.

बालिका, मतदान दिनानिमित्त कार्यक्रम

उस्मानाबाद : येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणतर्फे बालिका दिन व मतदान दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले. हा कार्यक्रम समर्थ नगरमधील इंदिरा गांधी नर्सिंग महाविद्यालयात घेण्यात आला. यावेळी प्राधिकरणाचे सचिव एस. बी. तोडकर, ॲड. वैशाली धावणे, ॲड. डी. एस. जहागीरदार, ॲड. एम. बी. माढेकर विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. छत्रपाल वाघमारे यांनी आभार मानले.

सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

उस्मानाबाद : येथील के. टी. पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय व के. टी. पाटील वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. अजित मसलेकर, प्रा. पराग कुलकर्णी, प्रा. शीतलनाथ एखंडे , प्रा. कल्पना वराळे, प्रा. एस. एस. पाटील, वरिष्ठ लिपिक विनोद बनसोडे, अजय शिराळ, ग्रंथपाल जाधव आदी उपस्थित होते.

ठाकरे, बोस यांना अभिवादन

उस्मनाबाद : येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, किसन हजारे, आदर्श पवार, संजय जाधव, सुजित वाडकर, रमेश वागदकर, चित्रा सोनटक्के, मैना माळी, संगीता बलसुरे आदी उपस्थित होते.

रस्त्याची दुरवस्था

उस्मानाबाद : शहरातील देशपांडे स्टँडपासून नेहरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अगदी उतारालाच रस्त्यावर खड्डे पडले असून, यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

तारांना झोळ

मुरुम : शहरासह परिसरातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी महावितरणच्या वीज वाहिन्यांमध्ये झोळ पडल्याचे दिसत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

वाहतुकीची कोंडी

कळंब : शहरात सध्या मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्य चौकासह रहदारीच्या मार्गावर ही जनावरे ठिय्या मांडत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून, पालिका प्रशासनाने या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

पथदिवे बंद

नळदुर्ग :शहरातील काही भागातील पथदिवे सातत्याने बंद राहत आहेत. यामुळे नागरिकांची रात्रीच्या वेळी गैरसोय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सर्व दिवे सुरू करावेत, अशी मागणी शहरवासियांमधून केली जात आहे.

‘सुरळीत वीज द्या’

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी भागात शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.