कळंब येथे बियर बार फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:27 IST2021-05-03T04:27:01+5:302021-05-03T04:27:01+5:30

उस्मानाबाद : एका बियर बारचा कडी कोयंडा तोडून आतील २ लाख ८६ हजार ८३७ रुपयांच्या मद्यासह सीसीटीव्हीचा डीव्हीआर व ...

The beer bar broke at Kalamb | कळंब येथे बियर बार फोडले

कळंब येथे बियर बार फोडले

उस्मानाबाद : एका बियर बारचा कडी कोयंडा तोडून आतील २ लाख ८६ हजार ८३७ रुपयांच्या मद्यासह सीसीटीव्हीचा डीव्हीआर व किराणा साहित्य चोरुन नेले. ही घटना कळंब शहरात ३० एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणी कळंब ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद झाला.

कळंब येथे प्रदिप मेटे यांचे ‘सागर बियर बार ॲन्ड मरमीट रुम’ चे गोदाम आहे. या गोदामाचा ३० एप्रिल रोजी कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून आतील १ हजार ८९३ बॉक्स, सीसीटीव्हीचा डीव्हीआर व किराणा साहित्य चोरुन नेले. आतील फर्निचरची तोड-फोड करुन नुकसान केले. अशी फिर्याद बियर बार मालक प्रदिप मेटे यांनी कळंब पोलीस ठाण्यात दिली. यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द १ मे रोजी भा.दं.सं. कलम ४५७, ३८०, ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The beer bar broke at Kalamb