कबड्डी स्पर्धेत बीडच्या संघाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST2021-09-11T04:33:52+5:302021-09-11T04:33:52+5:30

येडशी : येथे श्रावण महिन्यात होणाऱ्या रामलिंग यात्रेनिमित्त आयोजित खुल्या कबड्डी स्पर्धेत आष्टी विरूध्द परंडा या संघात झालेल्या अटीतटीच्या ...

Beed team wins Kabaddi tournament | कबड्डी स्पर्धेत बीडच्या संघाने मारली बाजी

कबड्डी स्पर्धेत बीडच्या संघाने मारली बाजी

येडशी : येथे श्रावण महिन्यात होणाऱ्या रामलिंग यात्रेनिमित्त आयोजित खुल्या कबड्डी स्पर्धेत आष्टी विरूध्द परंडा या संघात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात आष्टी (जि. बीड) संघाने बाजी मारत विजेतेपद पटकाविले.

येथे दरवर्षी श्रावण महिन्यानिमित्त रामलिंग यात्रा भरविली जाते. मात्र, मागील वर्षीपासून कोरोनामुळे हा यात्रौत्सव रद्द करून सर्व धार्मिक कार्यक्रम मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. यात्रेनिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात विविध ठिकाणाहून ३० संघांनी सहभाग नोंदविला. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील धस दादा स्पोर्टस अकॅडमीने प्रथम, महाराष्ट्र कबड्डी संघ (परांडा) द्वितीय तर लातूरच्या सेवाभाया कबड्डी संघाने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. अंतिम स्पर्धेत विजयी खेळाडूंना उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेचे सूत्रसंचालन संतोष मुळे यांनी केले. यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष अक्षय ढोबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, सरपंच गोपाळ नागटिळक, तुळशीदास जमाले, युवासेना सचिव सुनील शेळके, विभाग प्रमुख विनोद पवार, नितीन भोसले, अमर पवार, अशोक पवार, विलास काळे, आबा शेळके आदी उपस्थित होते.

Web Title: Beed team wins Kabaddi tournament