बारला परवानगी, ग्रामपंचायतीला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST2021-02-11T04:34:40+5:302021-02-11T04:34:40+5:30
लोहारा (जि.उस्मानाबाद) : ग्रामसभा न घेता तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बार, परमिटरुमसाठी ना हरकत दिल्याने संतप्त झालेल्या ...

बारला परवानगी, ग्रामपंचायतीला टाळे
लोहारा (जि.उस्मानाबाद) : ग्रामसभा न घेता तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बार, परमिटरुमसाठी ना हरकत दिल्याने संतप्त झालेल्या गावातील तरुणांनी बुधवारी भोसगा ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.लोहारा तालुक्यातील भोसगा येथील तरुणांनी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात असे म्हटले आहे की, ग्रामसेवकांनी ग्रामसभा न घेता, कुणालाही याविषयी माहिती न देता पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांना कसलीही सुचना न देता बिअर बार व परमिट रुमच्या लायसन्ससाठी ना हरकत दिले आहे. ग्रामपंचायतच्या प्रोसेडिंगमध्ये अफरातफर, सदस्यांच्या खोट्या सह्या तसेच सरपंचाची सहीसुध्दा खोटी केल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत. सामाजिक घडी विस्कटू नये, यासाठी याप्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या तरुणांनी केली आहे. ग्रामपंचायतला टाळे ठाेकताना दादासाहेब वडगावे, यलालिंग एकुंडे, राजेंद्र मनाळे, राहुल पाटील, अन्वर शहा, सचिन कागे, मनोज जळकोटे, सतीश दासमे, काशिनाथ मानाळे, संतोष जली, शिवाजी बुवा, चंद्रकांत मानाळे व अन्य तरुण उपस्थित होते.