बापूराव पाटील यांचा मुरुमकरांकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST2021-09-05T04:36:30+5:302021-09-05T04:36:30+5:30
मुरूम शहर काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, राम डोंगरे, सुधीर चव्हाण, राहुल वाघ, सुधीर गायकवाड, गांधी चौकच्या वतीने ...

बापूराव पाटील यांचा मुरुमकरांकडून सत्कार
मुरूम शहर काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, राम डोंगरे, सुधीर चव्हाण, राहुल वाघ, सुधीर गायकवाड, गांधी चौकच्या वतीने नगरसेवक सिद्धलिंग स्वामी, मेनसे मामा, शंकर सोलापुरे, दुर्गे मामा, रणजित राजपूत आदींनी पाटील, धनगर समाजाच्या वतीने रुकप्पा बनने, धोंडिबा दूधभाते, दिगंबर सोनटक्के, रतन बनणे, श्रीकांत बनणे यांनी सत्कार केला. तसेच झुरळे गल्लीच्या वतीने खंडप्पा झुरळे, नगरसेवक सुरेश शेळके, लिंबण्णा खुणे, चंद्रकांत मंटगे तर कोथळी ग्रामस्थांच्या वतीने सुधीर गुरव व रामचंद्र तुंगावे यांनी पाटील यांनी सन्मान केला.
साेबतच केसरजवळगा येथील माजी सरपंच संगमेश्वर घाळे, श्रीमंत भुरे, रामचंद्र कोरे, अभिजित घाळे, अजीज शेख, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव यांनीही पाटील यांचा सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी राष्ट्रीय हॉलिबाॅल खेळाडू रणजित सिंह ठाकूर यांचा सत्कार केला. कार्यक्रमास जिल्हा परिषद गटनेते प्रकाश आष्टे, सुपतगाव सरपंच रतन लामजाने, उपसरपंच नागनाथ हेडले आदी उपस्थित होते. शहरातील माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, मुरूम सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष गोविंद कौलकर, उल्हास गुरगुरे आदींनीही पाटील यांचा सत्कार केला.