तुळजापुरात बाप्पांचे जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST2021-09-11T04:33:19+5:302021-09-11T04:33:19+5:30

तुळजापूर : श्री गणरायाचे तुळजापुरात शुक्रवारी भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळासह घरोघरी लाडक्या श्री ...

Bappa's warm welcome in Tuljapur | तुळजापुरात बाप्पांचे जोरदार स्वागत

तुळजापुरात बाप्पांचे जोरदार स्वागत

तुळजापूर : श्री गणरायाचे तुळजापुरात शुक्रवारी भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळासह घरोघरी लाडक्या श्री गणरायाचे स्वागत करुन प्रतिष्ठापणा करण्यात आली.

शहरातील आर्य चौक, घाटशीळ रोडवरील वहानतळ आदीसह भागात श्री गणेश खरेदीसाठी तर श्री गणेशासाठी लागणाऱ्या पुजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठामध्ये श्री गणेश भक्तांनी एकच गर्दी केली होती. या खरेदीसाठी पालकांसमवेत बालगोपाळांची देखील गर्दी दिसून आली. गणेश मूर्तीबरोबर इतरही साहित्य व मोदक प्रसादासाठी देखील खरेदी होत होती. संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे सलग दुसऱ्या वर्षी संकट कायम असल्याने कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने विघ्नहर्त्याचा जयघोष करीत स्वागत करण्यात आले.

प्रति वर्षा प्रमाणे याहीवर्षी येथील श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीची स्थापना किसान चौकी येथे नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी पुण्य पावन ज्योतीची गुरुवारी सायंकाळी नगर प्रदक्षिणा झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

चौकट.......

मंदिरात स्थापना

येथील श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने गणेशविहारात गणपतीची स्थापना मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्या हस्ते धार्मिक विधी करुन व आरती करून करण्यात आली. याचे पौराहित्य मंदिर उपाध्ये बंडोपंत पाठक यांनी केले. यावेळी मंदिर अधिकारी, कर्मचारी, भोपे पुजारी, सेवेकरी उपस्थित होते.

Web Title: Bappa's warm welcome in Tuljapur