महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी कांबळे यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:19+5:302021-06-26T04:23:19+5:30
ईट - येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी उत्कर्ष कांबळे यांची नुकतीच मुंबई येथे बदली झाली आहे. या निमित्त ...

महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी कांबळे यांची बदली
ईट - येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी उत्कर्ष कांबळे यांची नुकतीच मुंबई येथे बदली झाली आहे. या निमित्त त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भूम तालुक्यातील ईट येथील महाराष्ट्र बँकेची शाख नेहमीच चर्चेत असे. परंतु, कांबळे यांनी शाखाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर ग्राहकांच्या मनामध्ये बँकेविषयी विश्वास निर्माण करण्यास प्राधान्य दिले. थकित कर्जामुळे शेतकर्यांना नवीन पीक कर्ज मिळणे कठीण हाेते. यातून मार्ग काढत त्यांनी गावाेगावी जाऊन शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. थकित कर्ज भरल्यास नवीन कर्ज देण्याची त्यांनी हमी दिली. त्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला. त्यामुळे शेतकऱ्यात विश्वास निर्माण झाला. परिणामी काेट्यवधींची थकित कर्ज वसुली झाली. दरम्यान, काेराेनाच्या काळात शेतकऱ्यांना बँकेत येण्याची गरज भासू नये, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कर्ज वाटप केले. शेतकऱ्यांप्रति त्यांची तळमळ पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सत्कारही झाला हाेता. यासाेबतच त्यांनी अन्य उपक्रमही राबविले. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांना महाराष्ट्र बँक ही हक्काची वाटत हाेती. दरम्यान, शाखाधिकारी कांबळे यांची नुकतीच मुंबई येथे बदली झाली आहे. यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दत्ता असलकर, युवा सेना तालुका प्रमुख नीलेश चव्हाण, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष समीर काझी, काकासाहेब देशमुख, माजी उपसरपंच सचिन खामकर, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद वाडकर, श्रीराम वाघुंबरे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.