बलसूर ग्रामपंचायतीवर बिराजदार गटाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:54+5:302021-01-08T05:44:54+5:30
बलसूर : उमरगा तालुक्यातील १५ सदस्य असलेल्या बलसूर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश ...

बलसूर ग्रामपंचायतीवर बिराजदार गटाचे वर्चस्व
बलसूर : उमरगा तालुक्यातील १५ सदस्य असलेल्या बलसूर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने वर्चस्व मिळवत एकहाती सत्ता मिळविली.
गत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळकंठेश्वर ग्राम विकास पॅनल व विरोधी गटाचे बब्रुवान चव्हाण यांच्या गाव विकास पॅनलमध्ये १४ जागांसाठी चुरशीची लढत होऊन राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने सत्ता काबीज केली होती. यावेळेसही बलसूर येथील ५ प्रभागांत १५ उमेदवारांसाठी निवडणूक जाहीर झाली. या १५ जागांसाठी एकूण ४३ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी १७ अर्ज अवैध तर २६ वैध ठरले. हे अवैध ठरलेले १७ नामनिर्देशन पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या विरोधी बब्रुवान चव्हाण गटाचे होते. यामुळे बिराजदार गटाचा मार्ग याअगोदरच सुकर झाला होता. दरम्यान, वाॅर्ड क्रमांक ५ मधून एका अपक्षाचा अर्ज वैध ठरल्याने याच ठिकाणी निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती होती. मात्र, त्यांनीही सोमवारी माघार घेतल्याने अखेर बिराजदार गटातील १५ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या बलसूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.