शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाची व्यथा संपेना; पेरलेलं उगवलं नाही, गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:52 IST

शेतकऱ्याने नैराश्यातून आपल्याच शेतातील चिंचेच्या झाडाला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

ढाेकी (जि. उस्मानाबाद) -खरीप हंगामात पेरणी केली. परंतु, पावसाअभावी पेरलेलं उगवलंच नाही. यातून आलेल्या नैराश्यातून एका ४६ वर्षीय शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ४ जुलैच्या पहाटे साडेपाच वाजता उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा शिवारात घडली.

तावरजखेडा येथील शेतकरी संजय शामराव फेरे (४६)यांनी मागील आठवड्यात स्वतःच्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, यानंतर पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरलेलं बियाणं उगवलं नाही. यातून आलेल्या नैराश्यातून संजय फेरे यांनी आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना साेमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी विशाल श्रीकृष्ण फेरे यांनी दिलेल्या माहितीवरून ढाेकी पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. पुढील तपास बिट अंमलदार संजीवन जाधवर हे करीत आहेत. मयत संजय फेरे यांच्या पश्चात पत्नी, एक अंध मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

बॅंकेचे ८५ हजारांचे कर्जमयत संजय फेरे यांच्या मालकीच्या जमिनीवर काेंड येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे ८५ हजारांचे कर्ज आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढत त्यांनी जवळपास अडीच एकर क्षेत्रावर साेयाबीनची पेरणी केली. मात्र, पावसाअभावी बियाणाची उगवण झाली नाही. जवळचे पैसे गेले अन् बियाणेही उगवले नाही. त्यामुळे बॅंकेच्या कर्जाची परतफेड करायची कशी? या विवंचनेतून त्यांनी असे टाेकाचे पाऊल उचलले, असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याOsmanabadउस्मानाबाद