महाजन प्लॉटमध्ये घाण पाण्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST2021-05-28T04:24:17+5:302021-05-28T04:24:17+5:30

उमरगा : शहरातील शिवपुरी रोड भागातील महाजन प्लॉट येथे नालीचे पाणी साठून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नगर ...

Bad smell due to dirty water in Mahajan plot | महाजन प्लॉटमध्ये घाण पाण्यामुळे दुर्गंधी

महाजन प्लॉटमध्ये घाण पाण्यामुळे दुर्गंधी

उमरगा : शहरातील शिवपुरी रोड भागातील महाजन प्लॉट येथे नालीचे पाणी साठून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नगर परिषदेने या भागातील नाली व रस्ते नव्याने तयार करावेत अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशारा रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

शहरातील शिवपुरी रोडवरील महाजन प्लॉटमध्ये पाटील चिंचोलीकर यांच्या घरापासून पश्चिमेकडे जाणाऱ्या व शिवपुरी रोडला जोडलेल्या ठिकाणी रस्त्याचा खोलगट भाग तयार झाला आहे. येथे पोलीस ठाण्यापासून येणारे नालीचे पाणी साचून मोठी दलदल निर्माण झाली आहे. येथे घाण पाणी थांबून राहिल्याने दुर्गंधी पसरत आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून या भागातील नाल्यांची साफसफाई होत नाही, असा आरोप रहिवाशांनी निवेदनात केला आहे.

प्रशासनाने या भागातील नाली व रस्ते नव्याने तयार करावेत अन्यथा नगर परिषदेच्या कारभाराबाबत उमरगा न्यायालयात दाद मागू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर सविता दुधभाते, दादाराव औरादे, अण्णाराव कदम, भारती खिलोशिया, पद्माकर पाटील आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Bad smell due to dirty water in Mahajan plot