बाळ वारंवार डायपर ओले करतेय, तातडीने डॉक्टरांना दाखवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST2021-07-23T04:20:19+5:302021-07-23T04:20:19+5:30
आई-वडिलांना डायबिटीज असेल तर... आई-वडिलांना डायबिटीज असला तर त्यांच्या मुलांना होण्याचा धोका अधिक असतो. ३० वर्षानंतर डायबिटीज होण्याचा धोका ...

बाळ वारंवार डायपर ओले करतेय, तातडीने डॉक्टरांना दाखवा !
आई-वडिलांना डायबिटीज असेल तर...
आई-वडिलांना डायबिटीज असला तर त्यांच्या मुलांना होण्याचा धोका अधिक असतो. ३० वर्षानंतर डायबिटीज होण्याचा धोका अधिक संभावतो. बदलती जीवनशैली, बैठे काम, साखरेचे अतिरिक्त सेवन करण्यानेही आजार होत असतो. त्याकरिता नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. आजार टाळण्याकरिता सकस आहार व व्यायामावर भर द्यावा, असे डॉक्टर म्हणाले.
काय आहेत लक्षणे
बाळाला वारंवार लघवी येणे
जास्त भूक लागणे
चिडचिडेपणा जास्त जाणवणे
वजन न वाढणे
वारंवार आजारी पडणे
जंतू संसर्ग होणे
सतत सर्दी होणे
दुर्लक्ष करु नका...
लहान बाळांना टाईप १ डायबिटीज झाला असेल तर तो पालकांना लवकर समजत नाही. वारंवार डायपर ओले करीत असल्यानंतर त्यास डॉक्टरांना दाखवून घेणे गरजेचे आहे. त्वरित उपचार घेतल्यास गुंतागुंत टळू शकते. आजार नियंत्रणात ठेवण्याकरिता कायमस्वरुपी इन्सुलिन सुरु ठेवावे लागते.
डॉ. नितीन भोसले. बालरोग तज्ज्ञ
टाईप १ डायबिटीज मध्ये इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे बाळ वारंवार आजारी पडते. शिवाय त्यास जंतू संसर्ग होतो. त्यामुळे लक्षणे दिसताच पालकांनी बाळास डॉक्टरांना दाखवून घ्यावे. इन्सुलिन व्यवस्थित दिले जाणे गरजेचे असते.
डॉ. आर.यु. बोराडे, बालरोग तज्ज्ञ