भूम शहरात प्रशासनाकडून जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:33 IST2021-04-22T04:33:44+5:302021-04-22T04:33:44+5:30
भूम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकजण आजार अंगावर काढत असल्याने उपचारासाठी गंभीर रुग्ण वाढत आहेत. शिवाय, संचारबंदी काळात अनेक ...

भूम शहरात प्रशासनाकडून जनजागृती रॅली
भूम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकजण आजार अंगावर काढत असल्याने उपचारासाठी गंभीर रुग्ण वाढत आहेत. शिवाय, संचारबंदी काळात अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. या अनुषंगाने बुधवारी महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून संयुक्त रॅली काढून जनजागृती करण्यात आली. शहरातील ओंकार चौक, नगरपालिका चौक, गांधी चौक, वेताळ रोड, अण्णा भाऊ साठे चौक, पारधी पेढी, गोलाई चौक या मार्गे पोलीस कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी लाऊड स्पीकरद्वारे कोरोना नियम पाळण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. रस्त्यावर विनाकरण फिरताना कोणी आढळून आल्यास लगेच जागेवर त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येऊन जे कोरोना पॉझिटिव्ह येतील, त्यांना गोलेगाव येथील कोरोना सेंटरला पाठविण्यात येत आहे. या रॅलीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप जोगदंड, नायब तहसीलदार पाटील, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.