युवास्पंदन संस्थेस पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST2021-07-26T04:29:43+5:302021-07-26T04:29:43+5:30

तुळजापूर : सोलापूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट रक्तदान शिबिर व रक्त संकलन पुरस्कार येथील ...

Awarded to Yuvaspandan Sanstha | युवास्पंदन संस्थेस पुरस्कार प्रदान

युवास्पंदन संस्थेस पुरस्कार प्रदान

तुळजापूर : सोलापूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट रक्तदान शिबिर व रक्त संकलन पुरस्कार येथील युवास्पंदन सामाजिक संस्थेला देण्यात आला. खा. डाॅ. शिवाचार्य जयसिद्धेश्वर महाराज व सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते युवास्पंदन संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तुळजापूर शहर व परिसरात २०२०-२१ या वार्षिक वर्षात एकूण १५ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६८९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये युवास्पंदन सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या दोन शिबिरात १४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ‘युवास्पंदन’चे सचिव प्रा. प्रशांत भागवत यांनी आजपर्यंत ८० वेळा, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी ७२ वेळा व संस्थेचे मार्गदर्शक रवी पाटील (आरळीकर) यांनी ५२ वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: Awarded to Yuvaspandan Sanstha