प्रतिभा पाटील यांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST2021-04-17T04:32:08+5:302021-04-17T04:32:08+5:30

तुळजापूर : येथील महिला ग्रंथपाल प्रतिभा ज्ञानेश्वर पाटील-सूर्यवंशी यांना मेडसिंगा येथील एका कार्यक्रमात स्वर्गीय भारतबाई सूर्यवंशी ग्रंथालय पुरस्कार ...

Award to Pratibha Patil | प्रतिभा पाटील यांना पुरस्कार प्रदान

प्रतिभा पाटील यांना पुरस्कार प्रदान

तुळजापूर : येथील महिला ग्रंथपाल प्रतिभा ज्ञानेश्वर पाटील-सूर्यवंशी यांना मेडसिंगा येथील एका कार्यक्रमात स्वर्गीय भारतबाई सूर्यवंशी ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सार्वजनिक ग्रंथालय चळवळीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ग्रंथमित्र व. ग. सूर्यवंशी यांनी २०२१ या वर्षीपासून या पुरस्कार दिला जातो. माजी गटशिक्षण अधिकारी सविता भोसले, माजी जि. प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड, माऊली महाराज अनसुरडेकर व ग्रंथालय क्षेत्रात गेली पन्नास वर्षे कार्य करणारे ग्रंथमित्र व. ग. सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपाल या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. आभार माउली महाराज यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण सूर्यवंशी, वारकरी संप्रदायातील शिष्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास मेडसिंगा व या परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसदस्य यांच्यासह सूर्यवंशी कुटुंबाचे नातेवाईक, स्नेही राजाराम पवार, अंकुश साळुंखे ,राजकुमार मोरे, बिभीषण पाटील, प्रतीक सूर्यवंशी, उद्धव पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Award to Pratibha Patil