भाग्यश्री केसकर यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST2021-06-10T04:22:19+5:302021-06-10T04:22:19+5:30

उस्मानाबाद : येथील कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या काव्यसंग्रहाला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकॅडमीच्या ...

Award to Bhagyashree Keskar's poetry collection | भाग्यश्री केसकर यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार

भाग्यश्री केसकर यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार

उस्मानाबाद : येथील कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या काव्यसंग्रहाला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकॅडमीच्या वतीने उत्कृष्ट कवितासंग्रहाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार वितरित केला जाणार असल्याचे अकॅडमीचे सचिव प्रकाश घादगीने यांनी कळविले आहे.

लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीच्या वतीने सन २०१९-२०करिता राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात आले होते. यात कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मकथा या विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. आलेल्या ग्रंथांतून परीक्षकांनी काव्य विभागातून भाग्यश्री केसकर यांच्या काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली. या निवडीची घोषणा अकॅडमीच्या वतीने करण्यात आली. मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या भाग्यश्री केसकर यांच्या कवितासंग्रहाला महात्मा जोतिबा फुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Award to Bhagyashree Keskar's poetry collection