शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:33 IST2021-04-22T04:33:38+5:302021-04-22T04:33:38+5:30

बांध फोडण्याच्या कारणावरून मारहाण परंडा : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील मंजूषा अशोक यादव या १८ एप्रिल रोजी पती व ...

Attempt to kill by swearing | शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न

शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न

बांध फोडण्याच्या कारणावरून मारहाण

परंडा : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील मंजूषा अशोक यादव या १८ एप्रिल रोजी पती व मुलासह त्यांच्या घरासमोर थांबल्या होत्या. यावेळी सोमनाथ, सुरेश हिकन, सुनीता, सारिका, संदीप, परसू माळी यांनी मंजूषा यांना बांध फोडण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून चप्पलने मारहाण केली. तसेच पती अशोक, मुलगा सुशांत यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मंजूषा यादव यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुऱ्हाडीच्या दांड्याने केली मारहाण

परंडा : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील सोमनाथ व सुरेश माळी हे दोघे भाऊ १८ एप्रिल रोजी त्यांच्या शेताकडे जात होते. यावेळी गावकरी अशोक, मंजूषा, विजय व राजुबाई यादव यांनी सोमनाथ व सुरेश यांना बांध फोडण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून जीवे मारण्याची धमकी दिली, अशा मजकुराच्या सोमनाथ माळी यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempt to kill by swearing