शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: मतदार यादीच्या गोंधळाची सोशल मिडियात पोस्ट करणाऱ्याच्या घरावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:05 IST

प्रभागातील यादीत बाहेरील गावात वास्तव्यास असलेल्या लोकांची नावे दिसून आल्याचा दावा

धाराशिव : आपल्या प्रभागातील मतदार यादीत गोंधळ झाला असून, बाहेरगावातील नावे यात समाविष्ट केल्याची पोस्ट सोशल मीडियात टाकल्याने रविवारी धाराशिवमध्ये आपल्या घरावर हल्ला झाल्याचा दावा ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्याने सोमवारी केला आहे. जवळपास सहा जणांनी घरात घुसून जबर मारहाण केल्याने संबंधित कार्यकर्ता व त्याची आई जखमी झाली असून, त्यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

धाराशिव नगरपालिकेची अंतिम मतदार यादी तांत्रिक कारणामुळे ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होऊ शकली नव्हती. दरम्यान, ती प्रसिद्ध होताच कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील मतदारांची यादी तपासली. ठाकरेसेनेचे कार्यकर्ते गणेश साळुंके यांनीही त्यांच्या प्रभागातील यादी तपासली असता, त्यात बाहेरील गावात वास्तव्यास असलेल्या लोकांची नावे दिसून आल्याचा दावा ते करीत आहेत. यातून साळुंके यांनी सोशल मीडियात याबाबतची पोस्ट व्हायरल केली. याचा राग मनात धरून विरोधक विलास लोंढेसह इतर पाच-सहा जणांनी रविवारी रात्री घरावर हल्ला केला. घरात व अंगणात दगडफेक करून ते घरात शिरले. त्यांनी आपल्यासह आईलाही मारहाण केल्याचा दावा गणेश साळुंके यांनी केला आहे. या दोघांवरही धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

मनसे झाली आक्रमकठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिक मनसे चांगलीच आक्रमक झाली. पदाधिकारी पाशा शेख यांनी या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार विलास लोंढे असून, त्यांनी कामगार नोंदणी प्रक्रियेत हेराफेरी करीत मोठी माया जमवल्याचा आरोप केला आहे. विलास लोंढे याच्यासह त्याच्या साथीदारांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी शेख यांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

तक्रारीसाठी दोघेही ठाण्यातगणेश साळुंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर सोमवारी ते तसेच विलास लोंढे दोघेही शहर ठाण्यात तक्रारीसाठी गेले होते. साळुंके यांच्याकडून मारहाण तर लोंढे यांच्याकडून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार असल्याचे समजते. मात्र, सक्षम अधिकारी त्यावेळी नसल्याने गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv: Attack over social media post on voter list irregularities.

Web Summary : Thackeray Sena worker attacked in Dharashiv for posting about voter list irregularities. Allegedly, outsiders' names were included. Both the worker and his mother were injured. Police investigation ongoing.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक 2024