महिन्यापासून एटीएम बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:01 IST2021-03-04T05:01:18+5:302021-03-04T05:01:18+5:30

(सिंगल फोटो : अजीत चंदनशिवे ३) तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील मुख्य रोडवर असलेल्या भवानी रोडवरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम ...

ATMs closed for months! | महिन्यापासून एटीएम बंद !

महिन्यापासून एटीएम बंद !

(सिंगल फोटो : अजीत चंदनशिवे ३)

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील मुख्य रोडवर असलेल्या भवानी रोडवरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मागील महिनाभरापासून बंद असल्याने हजारो खातेदार या सेवेपासून वंचित आहेत.

तुळजापूर येथील कमान वेस भागातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शहरासह परिसरातील गावातील हजारो नागरिकांचे खाते आहेत. दररोज लाखो रुपयांचा व्यवहार या बँकेतून होत असतो. बँकेतील खातेदारांची संख्या जास्त असल्याने या बँकेत नेहमीच गर्दी असते. वर्दळीच्या ठिकाणी ही बँक शाखा असून, पार्किंग व्यवस्थेअभावी खातेदार रस्त्यावरच दुचाकी उभी करून बँकेत कामकाजासाठी जात असल्याने काही वेळा वाहतुकीची कोंडीसुद्धा होत आहे. त्यामुळे एटीएम सुरू करून वाहन पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

कोट......

तुळजापूर येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून बंद असते. आता तर मागील महिनाभरापासून या एटीएमचे शटर बंद आहे. यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.

- विजय भोसले, ग्राहक.

Web Title: ATMs closed for months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.