प्राथमिक शाळा अन् शिक्षकांचे प्रश्न साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:53+5:302021-02-05T08:18:53+5:30
कळंब - राज्यातील जिल्हा परिषद,नगरपालिका व महानगरपालिका शाळेचे व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक ...

प्राथमिक शाळा अन् शिक्षकांचे प्रश्न साेडवा
कळंब -
राज्यातील जिल्हा परिषद,नगरपालिका व महानगरपालिका शाळेचे व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन खंड २ प्रसिध्द करावा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणसेवकांचे मानधन वाढवून अनुक्रमे ३० व ४० हजार करावे, प्राथमिक शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश देऊन भेदभाव थांबवावा, २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करू नयेत, अंशदान पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकांचे निधन झाल्यास विनाअट दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी इतर कर्मचाऱ्याप्रमाणे कॅशलेश सुविधा देण्यात यावी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतश्रेणीसाठी दहा, वीस व तीसची आश्वासित योजना लागू करावी, वस्ती शाळेत नेमणूक दिलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी मूळ नेमणूक दिनांक ग्राह्य धरावा आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षक नेते संभाजी थोरात व प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन दिले. दरम्यान, शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्या न्याय असून त्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात आपल्यासमवेत सचिवस्तरीय बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
शिष्टमंडळात शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस आप्पासाहेब कुल, संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील, नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, महासचिव बाळासाहेब झावरे, राजेश वाघमारे,जीवनराव वडजे, मनोज मोरे, दत्तात्रय पवार, मिलिंद गांगुर्डे, विशाल खरमोडे, किशोर पवार, रामदास आव्हाड, रवींद्र घरत, प्रकाश मसले, संदीप मोरे आदींचा समावेश हाेता.