आश्लेष मोरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:46+5:302021-03-07T04:29:46+5:30
उमरगा : आश्लेष मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे उपविभागीय कार्यालयात संगणक भेट, पोलीस ...

आश्लेष मोरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
उमरगा : आश्लेष मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे उपविभागीय कार्यालयात संगणक भेट, पोलीस ठाण्यात सर्व पोलीस व नगरपालिका कर्मचाऱ्यांना कोरोना किट वाटप, आदी उपक्रम पार पडले. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूलमधील २३ निराधार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव आश्लेष मोरे यांनी स्वीकारली.
या कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शकुंतला मोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य संजय अस्वले, प्रा. धनाजी थोरे, प्रा. डाॅ. एस. पी. इंगळे, प्रा. राजेद्र सूर्यवंशी, किसन नागदे, प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, आश्लेष मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल कानेकर, डॉ. विनोद देवरकर, प्रा. विलास पवार, प्रा. राजू सूर्यवंशी, डॉ. एस. पी. इंगळे, श्रीधर ढगे, सचिन बिद्री, आदी उपस्थित होते.
आश्लेष मोरे मित्र मंडळाच्या वतीने उपविभागीय पोलीस कार्यालयात लॅपटॉप व कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आले. पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आले. तलमोड व परिसरातील जगदाळवाडी, धाकटीवाडी येथे विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर तसेच अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
उमरगा बस स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी पाच बेंच भेट देण्यात आले. तसेच कदमापूर येथील महिला बचत गटास तीन शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या. यावेळी किशोर औरादे, अशोक मम्माळे उपस्थित होते. पालिकेतील मान्यवरांच्या हस्ते तसेच शासकीय उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विक्रम आळंगेकर यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आले.