आशा कार्यकर्तींचा खामसवाडीत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:39+5:302021-01-08T05:44:39+5:30
खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आशा कार्यकर्तींचा सत्कार सरपंच मनिषा कोळी, सीमा माळी ...

आशा कार्यकर्तींचा खामसवाडीत सत्कार
खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आशा कार्यकर्तींचा सत्कार सरपंच मनिषा कोळी, सीमा माळी यांच्या हस्ते करण्यात आला.
यानिमित्त येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चौकात प्रतिमेचे पूजन तसेच प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फलकाचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, शिवाजीराव गिड्डे, मकरंद पाटील, दादासाहेब कोठे-पाटील, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे, भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस आनिता शेळके, मुख्याध्यापक दत्तात्रय रसाळ, वैभव मुंडे, सुनील पाटील, गोपाल शेळके, शिवाजी बोबडे, अनिल शेळके, सतीश वैद्य, दिलीप गर्जे, बलराम कुलकर्णी, विश्वास कोकणे, भीमराव कांबळे, बाळासाहेब पाटुळे, बाबासाहेब पाटुळे, जगदिश पाटुळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हनुमंत पाटुळे यांनी तर आभार सावता माळी यांनी मानले.
भूम जि. प. हायस्कूल
(फोटो - ०४)
भूम : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हरिश साठे, तन्वी माने, वैशाली आपशिंगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी व शिक्षक हरिश साठे, तात्या कांबळे यांनी पुस्तके वाचण्याचा संकल्प केला. तन्वी माने व वैशाली आपशिंगे यांनी गीत गायन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी, आभार तन्वी माने हिने मानले.
विद्याभवन हायस्कूल (फोटो - ०४)
कळंब : येथील विद्याभवन हायस्कूलमध्ये महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक विलास पवार, उप-मुख्याध्यापिका रत्नमाला धाबेकर, पर्यवेक्षिका सरला पाटील, मंगल माने, आशा लोहार, डॉ. जगदेवी कोळी, उमा गाढवे, सुरेखा गायकवाड, रोहिणी मोहेकर, सुनीता येळे, बालिका गाडेकर, लोमटे, सुचिता गुंजाळ, संजय जगताप, संभाजी गिड्डे, आनंद रामटेके, विक्रम मयाचारी, विनोद सागर, अकबर शेख, शहाजी माने, शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम सोनके, सुनील बावकर, प्रशांत गुरव, दत्तात्रय नलावडे, श्रीकांत पांचाळ, चंद्रसेन जगताप, काळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो - ०४)
तुळजाभवानी महाविद्यालय
तुळजापूर - येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. शेखर जगदे, उपप्राचार्य प्रा. रवी मुदकना यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. श्यामकांत डोईजोडे, प्रा. छाया घाडगे, प्रा. प्रिया सुरवसे, विवेक गंगणे, प्रा. संतोष एकदंते आदींची उपस्थिती होती.
संगणकशास्त्र महाविद्यालय
उस्मानाबाद : येथील के.टी. पाटील संगणकशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अजित मसलेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी डॉ. कृष्णा तेरकर, प्रा. पराग कुलकर्णी, प्रा. एस. आर. एखंडे, प्रा. के. पी. वराळे, प्रा. एस. एस. पाटील, विनोद बनसोडे, शिराळ उपस्थित होते.