खून प्रकरणातील आराेपीस चाैदा तासांत ठाेकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST2020-12-30T04:41:48+5:302020-12-30T04:41:48+5:30

बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथील चालक सहदेव मधुकर ढाकणे व सहाय्यक गणेश सांगळे हे दाेघे ट्रक घेऊन नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावरून जात ...

Arrests in the murder case were handcuffed in four hours | खून प्रकरणातील आराेपीस चाैदा तासांत ठाेकल्या बेड्या

खून प्रकरणातील आराेपीस चाैदा तासांत ठाेकल्या बेड्या

बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथील चालक सहदेव मधुकर ढाकणे व सहाय्यक गणेश सांगळे हे दाेघे ट्रक घेऊन नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावरून जात हाेते. हा ट्रक गंधाेरा शिवारात आला हाेता. याचवेळी समाेरील विना क्रमांकाच्या दुचाकीला ट्रकचा धक्का लागला. यामुळे संतप्त झालेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने ट्रकचालक ढागणे व सहाय्यक सांगळे यांना लाेखंडी गजाने मारहाण केली. यात सांगळे यांच्या डाेक्यास गंभीर दुखापत हाेऊन त्यांचा मृत्यू झाला. तर ढाकणे गंभीर जखमी झाले. यानंतर अज्ञात दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून वाहनासह पाेबारा केला. या प्रकरणी नळदुर्ग ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरूद्ध खुनाचा गुन्हा नाेंद झाला हाेता. मात्र, आराेपी अज्ञात असल्याने त्याचा शाेध घेण्याचे आव्हान नळदुर्ग पाेलिसांसमाेर हाेते. संबंधित दुचाकीस्वार किरकाेळ जखमी झाला हाेता, अशी माहिती सपाेनि जगदीश राऊत यांच्या पथकास मिळाल्यानंतर नळदुर्ग तसेच तुळजापुरातील खाजगी दवाखाने धुंडाळून एखादा जखमी तरूण उपचारासाठी आला हाेता का? याचा शाेध घेण्यात आला. त्यावर तुळजापुरातील एका खाजगी दवाखान्यात जखमी तरूण उपचारासाठी दाखल झाल्याचे समजले. यानंतर पाेलिसांनी तेथे जावून चाैकशी केली असता, खात्री पटली. यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यास बेड्या ठाेकल्या. सुंदर सतीश गवळी (वय२४, रा. वडगाव देव) असे आराेपीचे नावआहे.

Web Title: Arrests in the murder case were handcuffed in four hours