खुनाच्या गुन्ह्यातील आराेपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST2021-04-30T04:42:04+5:302021-04-30T04:42:04+5:30

६० कारवायांत १२ हजाराचा दंड वसूल उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक केले आहे. या मनाई ...

Arrested for murder | खुनाच्या गुन्ह्यातील आराेपी जेरबंद

खुनाच्या गुन्ह्यातील आराेपी जेरबंद

६० कारवायांत १२ हजाराचा दंड वसूल

उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक केले आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी जिल्हाभरात जवळपास ६० कारवाया करण्यात आल्या आहेत. यात संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. दंडापाेटी सुमारे १२ हजार ३०० रूपये वसूल केले आहेत. तसेच दुचाकीवर जादा प्रवासी बसवून प्रवास केल्या प्रकरणी दाेघांविरूद्ध कारवाई केली. त्यांना प्रत्येकी २ हजार रूपये दंड केला आहे.

फुलवाडी शिवारात छापा, दारू जप्त

उस्मानाबाद -तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी शिवारात छापा मारून नळदुर्ग पाेलीस ठाण्याच्या पथकाने सराटी येथील आनंद भारत काेरे यास रंगेहात पकडले. त्याच्याकडून देशी दारूच्या साेळा बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविले

उमरगा - उमरगा तालुक्यातील तलमाेड येथील चालक महादेव धनराज गायकवाड हे २८ एप्रिल राेजी राष्ट्रीय महमार्गावर आपल्या ताब्यातील वाहन मद्यधुंद अवस्थेत चालविताना उमरगा ठाण्याच्या पथकास मिळून आले. या प्रकरणी पाेकाॅ.तानाजी शिंदे यांनी सरकार पक्षाच्या वतीने फिर्याद दाखल केली. त्यावरून चालक गायकवाड याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Arrested for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.