नऊ वर्षांपासून फरार आराेपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST2021-05-23T04:32:26+5:302021-05-23T04:32:26+5:30
दाेन लाखांचा केला दंड वसूल उस्मानाबाद- माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी सुमारे ९१८ वाहन चालकांकडून २ लाख ४ ...

नऊ वर्षांपासून फरार आराेपी जेरबंद
दाेन लाखांचा केला दंड वसूल
उस्मानाबाद- माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी सुमारे ९१८ वाहन चालकांकडून २ लाख ४ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हाभरातील अठरा पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आली. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालवावीत, असे आवाहन पाेलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे भाेवले
उस्मानाबाद - काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंगण्यास मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी जिल्हाभरातील २१ जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे ७ हजार ४०० रूपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
विनामास्क वावरणार्या ११३ जणांना दंड
उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. असे असतानाही अनेकजण विनमास्क वावरत आहेत. अशा लाेकांविरूद्ध प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. २१ मे राेजी जिल्हाभरात ११३ कारवाया करण्यात आल्या. संबंधितांकडून दंडापाेटी ५६ हजार ५०० रूपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावठी दारू जप्त, गुन्हा दाखल
उस्मानाबाद - तालुक्यातील काेंड येथील बस थांब्याजवळील चाैकात पाेलिसांनी छापा मारून ५ लिटर गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी सिद्धेश्वर जाधव (रा.भीमनगर, काेंड) याच्याविरूद्ध ढाेकी पाेलीस ठाण्यात महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ढाेकी पाेलीस करीत आहेत.
जुगार अड्ड्यावर पाेलिसांचा छापा
उस्मानाबाद - तालुक्यातील ढाेकी येथील पेट्राेलियम विक्री केंद्राजवळ असलेल्या एका पानटपरी शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी २१ मे राेजी दुपारी २ वाजता अचानक छापा मारला. या कारवाईत राेख १ हजार ५० रूपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सुभाष दादाहरी गाढवे (रा.ढाेकी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.