अणदूर अत्याचार प्रकरणातील आराेपीस अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:39 IST2021-02-17T04:39:05+5:302021-02-17T04:39:05+5:30

अणदूर येथील नववीच्या वर्गात शिकणार्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेतील तीन पैकी दाेघांना अटक करण्यात ...

Arrest the accused in the case of far-reaching atrocities | अणदूर अत्याचार प्रकरणातील आराेपीस अटक करा

अणदूर अत्याचार प्रकरणातील आराेपीस अटक करा

अणदूर येथील नववीच्या वर्गात शिकणार्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेतील तीन पैकी दाेघांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आराेपी आजही फरार आहे. संबंधित आराेपीस तातडीने अटक करण्यात यावी. तसेच हा खटला फास्टट्रॅक काेर्टात चालवून आराेपींना कठाेर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी शिवा अखिल भारतीय वरीशैव युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदाेलने करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हा प्रमुख संजय गिराम, उपजिल्हाध्यक्ष विनाेद वाडकर, नितीन लगदिवे, बाबा अवधूत, चंद्रकांत डांगे, समाधान भाेरे, महेश उपासे आदींची नावे आहेत.

Web Title: Arrest the accused in the case of far-reaching atrocities