शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

आम्ही कॉमन मॅन आहोत का? तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने जानकर संतापले

By बाबुराव चव्हाण | Updated: October 4, 2023 17:47 IST

प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल बघून रोखण्याचा प्रयत्न करावा. असली मगरुरी चालणार नाही

तुळजापूर (जि. धाराशिव) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना बुधवारी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यापासून कर्मचाऱ्यांनी राेखले. यानंतर जानकर यांनी ‘आम्ही काय काॅमन मॅन आहाेत काय? प्रशासनाने व्यक्तींचा प्राेटाेकाॅल पाहून राेखण्याचा प्रयत्न करावा. ही मगरूरी चालणार नाही’, अशा शब्दात संताप व्यक्त केला. घडलेला प्रकार जिल्हाधिकारी यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जनसुराज्य यात्रेच्या निमित्ताने रासपचे जानकर बुधवारी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले हाेते. दर्शन घेण्यासाठी ते गाभाऱ्यात जात असतानाच ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला. यानंतर जानकर चांगलेच संतापले. ‘आम्ही काय काॅमन मॅन आहाेत काय? आमचे फाेटाे लावून लाेक खासदार, आमदार हाेतात. माझा कुठेही कारखाना, उद्याेग नाही. मी माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर राज्य आणि देशासाठी काम करताे. त्यामुळे प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल बघून रोखण्याचा प्रयत्न करावा. असली मगरुरी चालणार नाही अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. ‘बीव्हीजी’चे मालक माझ्या गावचे आहेत. घडलेला हा प्रकार त्यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्या कानावर घालणार असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले.

‘ती’ अभिषेक पूजेची वेळ हाेती...रासपचे महादेव जानकर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले तेव्हा, सकाळची अभिषेक पूजा सुरू हाेती. ते गाभाऱ्यानजीक आले असतानाच पूजा संपली. मात्र, आरती सुरू हाेती. त्यामुळे अशावेळी ‘व्हीआयपीं’ना ज्या पध्दतीने दर्शन देताे, त्याच पध्दतीने त्यांचेही दर्शन झालेले आहे. ‘बीव्हीजी’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे जशी विचारणा केली जाते, तशीच विचारणा केली हाेती.-साेमनाथ माळी, तहसीलदार तथा व्यवस्थापक, मंदिर संस्थान.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMahadev Jankarमहादेव जानकर