उस्मानाबाद : शहरातील भीमनगर प्रवेशद्वारासमोर उभ्या करण्यात येत असलेल्या कमानीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असून, हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी बहुजन एकता विकास परिषदेने केली आहे.
याबाबत पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या भीमनगर भागातील मुख्य रस्त्यावर नगर परिषदेच्या वतीने कमानीचे बांधकाम जवळपास आठ ते दहा वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. परंतु, अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हा परिसर अशोभनीय वाटत आहे. त्यामुळे हे काम एप्रिल महिन्यापूर्वी मार्गी लावावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावर जिल्हाध्यक्ष प्रशांत बनसोेडे, भीम निर्णायक युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे, महादेव माने, अजय कांबळे, सिध्दान्त सोनवणे, अरुण गायकवाड, योगेश बनसोडे आदींच्या सह्या आहेत.