घरकुलाच्या २८२ प्रस्तावांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:10+5:302021-07-08T04:22:10+5:30
याचवेळी रमाई आवास (शहरी) घरकुल योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन जिल्ह्यातील नगर परिषदांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. ...

घरकुलाच्या २८२ प्रस्तावांना मंजुरी
याचवेळी रमाई आवास (शहरी) घरकुल योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन जिल्ह्यातील नगर परिषदांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या जिल्हास्तरीय समितीत जिल्हाधिकाऱ्यांनी, गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत ठराव पारित करून त्यांची माहिती एकत्रित करून त्याबाबत शक्य तितक्या गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी दिले.
चौकट.........
तृतीयपंथीयांच्या अडचणींबाबत चर्चा
ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण त्यांची माहिती एकत्र करण्यात यावी. यासाठी ग्रामसेवकांमार्फत माहिती गोळा करावी, साखर कारखान्यांकडून माहिती घ्यावी म्हणजे त्यांना आणि त्यांच्या मुलांना सुविधा देता येतील, असेही यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. तृतीयपंथीयांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना निवारा अर्थात घरकुल देणे, त्यांना आधारकार्ड, रेशनकार्ड देणे, मतदार यादीत नाव नोंदविणे, कोरोना लसीकरण करणे, त्यांचे बचत गट स्थापन करून त्यांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे, त्यांना निराधार योजनेचा लाभ देणे, कसण्यासाठी जमीन देण्याचा प्रयत्न करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.