संजय पाटील यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST2021-02-12T04:30:37+5:302021-02-12T04:30:37+5:30

अवैध उत्खनन; तीन वाहने ताब्यात अचलेर : येथील साठवण तलावाच्या बाजूस अवैधरित्या दगड फोडून त्याची वाहतूक करणारे एक जेसीबी ...

Appointment of Sanjay Patil | संजय पाटील यांची नियुक्ती

संजय पाटील यांची नियुक्ती

अवैध उत्खनन; तीन वाहने ताब्यात

अचलेर : येथील साठवण तलावाच्या बाजूस अवैधरित्या दगड फोडून त्याची वाहतूक करणारे एक जेसीबी व तीन वाहने महसूल विभागाने ताब्यात घेतले आहेत. येथील तलाठी वाय. एन. पवार यांनी ९ फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली. यावेळी ताब्यात घेतलेली वाहने मुरूम पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

-------------

डिजीटल यंत्रणा

(फोटो : उन्मेष पाटील ११)

कळंब : येथील जि. प. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतिने शिकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचे उद्‌घाटन एमआयएमचे तालुकाध्यक्ष वाजेद काझी यांच्या हस्ते झाले. यावेळी राजू सय्यद, मुख्याध्यापिका इनामदार, शिक्षक अन्सारी उपस्थित होते.

रहदारीस अडथळा

(फोटो : बालाजी बिराजदार ११)

लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक ८ मध्ये बसवराज बोराळे यांच्या घराच्या बाजूच्या रस्त्यावर मुरुमाचे ठिगारे पडले असल्याने या रस्त्यावरुन वावरताना नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दारू विक्रीत वाढ

येडशी : उस्मानाबाद तालुक्यातील येडशीसह परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे तरूण पीढी याच्या आहारी जात असून, पोलिस प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

चोऱ्या वाढल्या

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठवडी बाजारातून मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करीत असून, पोलिसांनी याचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

अंधाराचे साम्राज्य

कळंब : शहरातील अनेक भागातील अंतर्गत पथदिवे सातत्याने बंद राहत आहेत. यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सर्व दिवे सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Appointment of Sanjay Patil