‘मोहेकर मल्टीस्टेट’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST2021-09-21T04:36:41+5:302021-09-21T04:36:41+5:30
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन डॉ. अशोकराव मोहेकर यांनी यावेळी केले. संस्थेचे चेअरमन हनुमंत ...

‘मोहेकर मल्टीस्टेट’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन डॉ. अशोकराव मोहेकर यांनी यावेळी केले. संस्थेचे चेअरमन हनुमंत मडके यांनी मोहेकर मल्टीस्टेटचा लेखा-जोखा तसेच संस्थेचा वाढता आलेख मांडला. लोकांना काम देण्याचे काम युवकांनी उद्योग उभारून करावे. त्यासाठी लागणारा अर्थपुरवठा तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे ते म्हणाले.
यावेळी मोहेकर मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक संतोष मडके, सरपंच राजू झोरी, उपसरपंच सोमनाथ मडके, मोहेकर ॲग्रोचे संचालक बापूराव शेळके, सोसायटीचे माजी चेअरमन अनंतराव मडके, बाबासाहेब मडके, अशोक मडके, अच्युत मडके, फुलचंद मडके, माणिक आरकडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू जोशी, प्रास्ताविक मुख्य कार्यालय अधिकारी इम्रान शेख यांनी केले. आभार मोहेकर ॲग्रोचे कार्यकारी संचालक संतोष मडके यांनी मानले. (वाणिज्य वार्ता)