अण्णासाहेब पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST2021-02-12T04:30:08+5:302021-02-12T04:30:08+5:30
खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील माजी पोलीस पाटील अण्णासाहेब पांडुरंग पाटील (वय ८६) यांचे ९ फेब्रुवारी रोजी ...

अण्णासाहेब पाटील यांचे निधन
खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील माजी पोलीस पाटील अण्णासाहेब पांडुरंग पाटील (वय ८६) यांचे ९ फेब्रुवारी रोजी निधन झाले. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, चार सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. पत्रकार सुनील पाटील यांचे ते वडील होत.
बालाजी सगर
(फोटो : समीर सुतके ११)
उमरगा : येथील बालाजी गुंडेराव सगर (वय ३९) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी उमरगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या बलसूर शाखेत ते शाखाधिकारी या पदावर कार्यरत होते .
सुशीलाबाई काटकर
(फोटो : पांडुरंग पोळे ११)
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील सुशीलाबाई लक्ष्मणराव काटकर (वय ७५) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लोहगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. लोहगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक काटकर व येथील आरोग्य केंद्रातील नेत्र चिकित्सा अधिकारी आनंद काटकर यांच्या त्या मातोश्री होत.