जिल्हा उपाध्यक्षपदी अंजली बेताळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST2021-02-13T04:31:57+5:302021-02-13T04:31:57+5:30
फाेटाे आहे..उस्मानाबाद - भारतीय जनता पार्टी महिला माेर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अंजली कल्याण बेताळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षा ...

जिल्हा उपाध्यक्षपदी अंजली बेताळे
फाेटाे आहे..उस्मानाबाद - भारतीय जनता पार्टी महिला माेर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अंजली कल्याण बेताळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षा माधुरी गरड यांच्या हस्ते बेताळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र काैतुक हाेत आहे.
रस्त्यांवर खड्डेच खड्डे
उस्मानाबाद : शहरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेने लक्ष देऊन रस्त्यांची डागडुजी हाती घ्यावी, अशी मागणी रहिवाशांतून हाेत आहे.
वाढीव वीजबिले
उस्मानाबाद - एकीकडे विजेचे भारनियमन सुरू असतानाच दुसरीकडे वीज ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. त्यामुळे ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पाण्याची साेय
उस्मानाबाद - येथील जिल्हा परिषद इमारतीत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वाॅटर फिल्टर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गैरसाेय दूर झाली आहे.
‘पं.स.’ आवारात वृक्षाराेपण
उस्मानाबाद - येथील पंचायत समितीच्या आवारात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत वृक्षाराेपण केले. राेपांची पशुधनाने नासधूस करू नये, यासाठी जाळीही लावण्यात आली आहे.