शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

घटसर्पच्या साथीने पशुधन धोक्यात; पाच जणावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:01 IST

तुळजापूर तालुक्यातील देव कुरूळी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनास घटसर्प आजाराची लागण झाली आहे.

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील देव कुरूळी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनास घटसर्प आजाराची लागण झाली आहे. मागील चार दिवसांत पाच जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत.

देव कुरूळी गावातील शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. त्यामुळेच पशुधनाची संख्याही साडेचार हजाराच्या घरात आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून गावातील पशुधनामध्ये घटसर्पची साथ पसरली आहे. अनेकांच्या जनावरला घटसर्पसदृश्य आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चार दिवसांमध्ये या आजाराने पाच जनावरे दगावली आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच गावांमध्ये पशुधनासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. असे असतानाही घटसर्प या रोजागाची साथ पसरल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या ओहत. दरम्यान, सध्या पशुचिकित्सालांमध्ये औषधांचा तुटवडा जानवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. 

पशुधन पर्यवेक्षकाची जागा रिक्त देवकुरुळी हे गाव पिंपळा खुर्द येथील पशुवैद्यक दवाखान्यांतर्गत येते. या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकाचे पद मंजूर आहे. परंतु, मागील तीन महिन्यांपासून ही जागा रिक्त आहे. एखाद्या आजाराची साथ पसरल्यानंतर शेतकऱ्यांना गैैरसोयीला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सदरील रिक्त पद तातडीने भरावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती