शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी जिल्हा बँकेत चकरा मारून गमावला जीव; संतप्त नातेवाईकांनी बँकेसमोर ठेवला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 13:16 IST

बँकेकडून ठेवीची रक्कम दिली जात नसल्याने ते हताश झाले होते.

उस्मानाबाद : जिल्हा बँकेतील ठेवीच्या पैशासाठी वारंवार चकरा मारूनही हक्काची रक्कम मिळत नसल्यानेच सेवानिवृत्त बसचालकाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मृतदेह जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवला.

उस्मानाबाद शहरातील गणेशनगर भागातील रहिवासी गुलाबराव वीरभद्र परशेट्टी (वय ६५) हे राज्य परिवहन महामंडळात बसचालक या पदावर कार्यरत होते. आयुष्यभर नोकरी करून पोटाला चिमटे घेत जमा केलेले सुमारे १६ लाख रूपये त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेसह अन्य दोन शाखांमध्ये स्वत:च्या व पत्नीच्या नावे जमा केले होते. दरम्यान, रूग्णालयीन खर्च तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सदरील ठेव मिळावी म्हणून ते बँकेत चकरा मारीत होते. परंतु, बँकेकडून संपूर्ण रक्कम दिली जात नसल्याने ते हताश झाले होते. यातूनच  हृदयविकाराचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी परशेट्टी यांचा मृतदेह जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारात ठेवला. अर्ध्या तासानंतर बँकेकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

टॅग्स :Deathमृत्यूMONEYपैसाbankबँक