मुळज प्रशालेत आंबेडकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST2021-04-16T04:32:36+5:302021-04-16T04:32:36+5:30
उमरगा तालुक्यातील मुळज जि. प. प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक तुकाराम कुंभार, माळवदकर, ...

मुळज प्रशालेत आंबेडकर जयंती साजरी
उमरगा तालुक्यातील मुळज जि. प. प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक तुकाराम कुंभार, माळवदकर, अभय रेणके,शिवाजी कोळी आदींची उपस्थिती होती.
येडशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय सस्ते, ग्रा.प. सदस्य पंकज शिंदे, सुनील शेळके, संजय पाटील, विनोद पवार व ग्रामस्थ.
उमरगा तालुक्यातील जकेकूर येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, मुख्याध्यापक व्ही. टी. घोडके, प्रदीपकुमार समाने, संजय बिराजदार, संतोष बिराजदार, एम. सी. स्वामी आदी उपस्थित होते.
तुळजापूर नगरपरिषद कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी लोकरे, नगरसेविका हेमा कदम, नगरसेवक जगदाळे, विजय कंदले, औदुंबर कदम, माजी नगरसेवक विनोद गंगणे व कर्मचारी.
कळंब येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम, भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे परशुराम देशमाने, संतोष घाटपारडे, सुहास कदम ,दयानंद शिंदे, गणेश मोरे, मनोज नरहिरे, महादेव शिंदे, डॉ. धनाजी भालेराव, विनोद सागर, शैलेश गुरव, सादिक सय्यद, मुजम्मिल मुजावर, अभिजीत ओव्हाळ, नितीन जावळे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त कळंब येथील सुनील गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठवाडा दलित पॅंथरचे ज्येष्ठ नेते डी. जी. हौसलमल, बंडूभाऊ बनसोडे, सुनील गायकवाड, दादासाहेब बोराडे, हमीद खान, राहुल हौसलमल, सिद्धार्थ वाघमारे, आतिष वाघमारे, तुषार रणदिवे, बंडू ताटे, राजपाल गायकवाड, प्रशांत गायकवाड, पप्पू कसबे, सर्जेराव भालेराव आदी उपस्थित होते.
एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोंडगे, अजित साळुंके, विजया गायकवाड, धनराज पाटील, राजेंद्र सगर, सिद्धेश्वर वाकडे, माळाप्पा कोकरे, महादेव करके, दत्तू कांबळे, शिवाजी चेंडके, मोहन दुधंबे आदी कर्मचारी उपस्थित होते.