जिल्ह्यात आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST2021-04-16T04:32:41+5:302021-04-16T04:32:41+5:30
उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ...

जिल्ह्यात आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी
उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना, शासकीय, निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमा तसेच चौकातील प्रमुख पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
खामसवाडी ग्रामपंचायत
खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी ग्रामपंचायतीत सरपंच मनीषा कोळी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर, सावता माळी यांच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सावता माळी, सतीश वैद्य, बलराम कुलकर्णी, राजेश बिदले, नितीन बंडगर, नाना काकडे, प्रकाश तिबुले आदी नागरिक उपस्थित होते.
वलगुड येथे अभिवादन
उस्मानाबाद : तालुक्यातील वलगुड येथे पंचशील चौकात माजी शिक्षणाधिकारी एन. एम. सरवदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच सचिन सरवदे व आदिनाथ सरवदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारत ग्रामविकास समूह व पंचशिल प्रबोधन मंचतर्फे ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास बौद्ध उपासक, उपासिका, भारत ग्रामविकास समूह व पंचशिल प्रबोधन मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोविंदपूर येथे अभिवादन
खामसवाडी : कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे बुध्द विहारामध्ये प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथेही अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी वैभव मुंडे, ग्रामसेवक पंकज भानवसे, अनंत घोगरे, महादेव जाधव, अशोक मस्के, फकीर विधाते, अविनाश सावंत, मंगरूळ आरोग्य अधिकारी डॉ. चाळक, डॉ. ढोंबरे, एस. एस. येवले, के. एस. खंदारे, डॉ. मोरे, अंगणवाडी सेविका सुमन सुरवसे, पाटील, हिंगे, आशा सेविका दुर्गा दळवी, सीमा थोरात, मीनाक्षी बोंदर, मोरे, राजश्री मस्के, अश्विनी मस्के, अर्चना मस्के, बालाजी मस्के, दीपक मस्के, तानाजी मस्के, बापू जाधव, अक्षय मुंडे, संजय मस्के, शिवाजी हाटकर, खंडू मस्के तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
माडज येथे कार्यक्रम
माडज : उमरगा तलुक्यातील माडज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. उपसरपंच नरेंद्र माने, जयंती कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, शाहीर गोविंद सूर्यवंशी, नेताजी गायकवाड, शिरीष सूर्यवंशी, बळी गायकवाड, राजेंद्र सूर्यवंशी आदींनी अभिवादन केले.
जिल्हा रुग्णालय
उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख, डॉ. इस्माईल मुल्ला, डॉ. गोसावी, चव्हाण यांच्या हस्ते क्रांतिज्योती महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. याप्रसंगी डॉ. सुधीर सोनटक्के, डॉ. आदटराव, डॉ. जाधव, मेट्रन निकम, ओपीडी इन्चार्ज खिलारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सिध्दार्थ जानराव यांनी केले. कार्यक्रमासाठी नवनाथ सरवदे, शिनगारे, धरणे, गणेश चव्हाण, बाळू कोळेकर, तानाजी बाचाटे, ज्योतीराम ओहोळ, मेंढेकर, पवार, सदफुले आदी उपस्थित होते.
नेहरु युवा केंद्र
उस्मानाबाद : भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, उस्मानाबाद कार्यालयाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे वैभव लांडगे, रविकांत सुरवसे, विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंखे, स्वप्नील देशमुख, जिल्हा सल्ला समिती सदस्य प्रशांत मते आदी उपस्थित होते.