दिव्यांगांसाठी २५ हजारांच्या निधीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST2021-04-04T04:33:35+5:302021-04-04T04:33:35+5:30

सन २०१९-२० व २०२०-२१ या वर्षांतील हा निधी आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.दीपक जवळगे, सरपंच प्रवीण थोरात, नितीन सूर्यवंशी, ...

Allocation of funds of Rs. 25,000 for the disabled | दिव्यांगांसाठी २५ हजारांच्या निधीचे वाटप

दिव्यांगांसाठी २५ हजारांच्या निधीचे वाटप

सन २०१९-२० व २०२०-२१ या वर्षांतील हा निधी आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.दीपक जवळगे, सरपंच प्रवीण थोरात, नितीन सूर्यवंशी, विस्तार अधिकारी विनोद पवार व श्रीनिवास पाटील, माजी सरपंच गणेश जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रदीप जाधव, परमेश्वर साळुंके, संदीपान बनकर, शिवानंद राठोड आदींच्या हस्ते दिव्यांगांना या निधीचे वाटप करण्यात आले. यामध्ये अभिजीत साळुंके, विलास पवार, शिवाजी बाबर, सचिन साळुंके, आदेश जाधव या लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार ११४ रुपये याप्रमाणे एकूण रुपये २५ हजार ५७० देण्यात आले. ग्रामपंचायीने आपल्या स्वनिधीतून दिव्यांगासाठी ५ टक्के निधी उपलब्ध करून संबंधितांना त्याचे वाटप केल्याने, दिव्यांगांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Allocation of funds of Rs. 25,000 for the disabled